गडकरींचा तोतया ओएसडी नागपूरमध्ये  अटकेत 

गडकरींचा तोतया ओएसडी नागपूरमध्ये  अटकेत 


नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी (ऑफीसर ऑन स्पेशल ड्युटी) असल्याची बतावणी करणारा भामट्याला नागपूर विमानतळावर अटक करण्यात आली. यामुळे अशा तोतयांची टोळी तर नाही, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहे. 

गेल्या 31 जुलैला सकाळी साडेसात वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर गो-एअरवेजच्या काऊंटरवर बोर्डींग पास घेताना डॉ. जीझस वाघाडे या व्यक्तीने आपण नितीन गडकरी यांचे ओएसडी असल्याची बतावणी केली. यासाठी गडकरींचे ओएसडी असल्याचे व्हीजीटिंग कार्ड दाखविले. त्याच्यामागेच नितीन गडकरी यांचे अतिरिक्त खासगी सचिव अतुल मंडलेकर त्याच विमानासाठी बोर्डींग पास घेत होते. 

मंडलेकर यांनी लगेच पुढाकार घेऊन हे व्हिजीटिंग कार्ड आपलेच आहे काय? अशी विचारणा केली. या संदर्भात विमानतळावरावरील सीआयएसएफच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली. सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याने जीझस वाघाडेचे बिंग फुटले. त्याने मुंबईला स्पर्धा परिक्षेसाठी जावयाचे असल्याचे सांगितल्याने त्याला मुंबईला जाऊ देण्यात आले. नागपूरला आल्यानंतर त्याला सोनेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

डॉ. जीझस वाघाडे हा नागपुरातील ओंकारनगर भागातील आहे. हा एकटाच आहे की, यामागे कोणती टोळी काम करीत आहे काय? यासंदर्भात चौकशी सुरू आहे. या संदर्भात नितीन गडकरी यांचे ओएसडी सुधीर देऊळगावकर यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात 4 ऑगस्टला तक्रार नोंदविली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com