nagpur-nitin-gadkari-says-bjp-workers-narrow-minded | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

भाजप कार्यकर्त्यांची मने संकुचित होत आहेत : नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 ऑगस्ट 2018

चहा दिला नाही, निमंत्रण पत्रिकेत नाव छापले नाही म्हणून नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आता वाढली आहे. ही वृत्ती सोडा व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्तीचे आदर्श समोर ठेवा, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या.

नागपूर : चहा दिला नाही, निमंत्रण पत्रिकेत नाव छापले नाही म्हणून नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आता वाढली आहे. ही वृत्ती सोडा व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्तीचे आदर्श समोर ठेवा, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या.
 
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गडकरी यांनी वाजपेयींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 

पक्षाने अत्यंत कठीण परिस्थितीतून हे यश संपादन केले आहे. पक्ष मोठा झाला. परंतु कार्यकर्त्यांची मने मात्र संकुचित होत असल्याचे आता दिसून येत आहे. पक्षाच्या मिटींगमध्ये चहा-बिस्किट दिले नाही, निमंत्रण पत्रिकेत नाव छापले नाही, मोठ्या हाराने स्वागत केले नाही, बसायला समोरची खुर्ची दिली नाही, अशा छोट्या छोट्या कारणांनी नाराज झालेले कार्यकर्ते आता पक्षात आले आहेत. हा अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श नव्हे. अटलबिहारी वाजपेयी हे संसदीय समितीमध्ये राहत होते. त्यांनी कधीही आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी व नातेवाईकांसाठी उमेदवारी मागितली नाही. एखादा निर्णय त्यांच्या मनाच्या विरोधात गेला तरी त्यांनी कधी खंत व्यक्त केली नाही. पक्षाला त्यांनी सर्वोच्च स्थान दिले. त्यांची वर्तणूक हा खरा आपल्यासाठी आदर्श आहे. या आदर्शाचे पालन करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल, असेही गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
 

संबंधित लेख