nagpur-nitin-gadkari-road-construction | Sarkarnama

गडकरी आता सिमेंटवरून डांबरी रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

राज्यात व देशात सिमेंट रस्त्यांसाठी आग्रही असलेले केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी पुन्हा डांबर रस्ते बांधण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी आज एका कार्यक्रमात केले. 

नागपूर : राज्यात व देशात सिमेंट रस्त्यांसाठी आग्रही असलेले केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी पुन्हा डांबर रस्ते बांधण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी आज एका कार्यक्रमात केले. 

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा डांबरी रस्ते बांधणे सोयीस्कर असल्याचे स्पष्ट केले. 

काही वर्षांपूर्वी गडकरी यांनी डांबरी रस्ते हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे सांगून सिमेंटचे रस्त्यांचा आग्रह धरला होता. त्यानंतर राज्यभर सिमेंट रस्ते बांधण्याचा सपाटा सुरू केला होता. वर्षभरात डांबर रस्ते उखडतात. डांबर रस्त्यात प्रचंड गैरव्यवहार होते. कंत्राटदारांशी साटेलोटे  असल्याने स्थानिक प्रतिनिधी डांबर रस्त्यांसाठी आग्रही असल्याची जाहीर टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा केली होती. 

राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तयार झालेले सिमेंट रस्ते आजही शाबूत आहे. डांबर रस्त्यांमधील गैरव्यावहार आळा घालण्यासाठी त्यांनी सिमेंट रस्त्यांचे धोरण तयार केले. देशभरात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. त्यांना "रोडकरी'ही लोक म्हणून लागले. सिमेंट रस्त्यांना 20-25 वर्ष काहीच होत नाही, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. 

चार वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर सिमेंटचे रस्ते होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले. परंतु या रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब राहिल्याने नागपुरातील अनेक सिमेंटचे रस्ते उखडून गेले आहे. या संदर्भात जनमंच संस्थेने पाहणी केल्यानंतर स्वतः गडकरी यांनी या रस्त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सिमेंट कंपन्यांकडून अरेरावी होत असल्याने पुन्हा डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आता पुन्हा त्यांच्याकडून डांबर रस्ते तयार करण्याची भाषा होत आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. शासनाने मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडून सिमेंट खरेदी केले. या डांबरी रस्त्यांमध्ये प्लास्टिक आणि रबराचाही उपयोग करण्यात येईल. निरुपोयोगी प्लास्टिकचा उपयोग रस्त्यात करण्यासाठी आधिच शासनाने मंजूरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
 

संबंधित लेख