नागपुरात योगदिन `भाजप'साठी `मेगा इव्हेंट'; नितीन गडकरींची उपस्थिती

नागपुरात योगदिन `भाजप'साठी `मेगा इव्हेंट'; नितीन गडकरींची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने नागपुरात भारतीय जनता पक्ष मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकांशी संपर्क साधण्यासाठी या योगदिनाचा मेगा इव्हेंटचा उपयोग केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने नागपुरात भारतीय जनता पक्ष मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकांशी संपर्क साधण्यासाठी या योगदिनाचा मेगा इव्हेंटचा उपयोग केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
 
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जूनला साजरा केला जातो. यावर्षी या योगदिनाला नागपुरात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरविले आहे. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. नागपूर महापालिकेसह जवळपास 16 संघटनांच्या मदतीने शहरात ठिकठिकाणी योग दिन साजरा केला जाणार आहे. 

शहरातील योगदिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रम धंतोलीतील यशवंत स्टेडीयममध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी एकाचवेळी 20 हजारावर लोक योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. 

लोकांच्या यशवंत स्टेडीयमला येण्यासाठी सकाळी साडेपाच वाजेपासून शहरातील विविध भागातून शहर बससेवेची मोफत व्यवस्था केली आहे. 

यावर्षी पहिल्यांदाच योगदिनासाठी एवढी मोठी जय्यत तयारी केली जाणार आहे. या योगदिनाच्या कार्यक्रमाला महापौरांसह सर्व शहरातील खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहे. 

हा एक `मेगा इव्हेंट' होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सध्या भाजपचे लोकसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून या योगदिनाच्या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. 

शहरातील विविध भागात सुद्धा नगरसेवकांनी योगदिनाचे कार्यक्रम आयोजित करून लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी दिले आहेत.
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com