Nagpur News Gadkary Rudi Naidu Meeting | Sarkarnama

चंद्राबाबू नायडू व रुडींनी घेतली नितीन गडकरी यांची भेट : राजकीय वतुर्ळात उलट-सुलट चर्चा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

केंद्रीय मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेले केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या रामनगर येथील भक्ती निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. सायंकाळी अचानकपणे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही गडकरींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेले केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या रामनगर येथील भक्ती निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. सायंकाळी अचानकपणे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही गडकरींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या विरोधातील स्वपक्षातील नाराज नेत्यांची वाढत चालल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ही भेट औपचारिक असल्याचे गडकरी यांनी सांगितले. प्रताप रुडी म्हणाले, आपण गडकरी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होते. त्यांच्या नव्या वास्तुचे पूजनही होते. ही भेट राजकीय नव्हती असेही त्यांनी सांगितले.

रुडी यांनी भेट राजकीय नसल्याचे सांगितले असले तरी मंत्रिमंडळातून हटविल्याने भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा उघडपणे केंद्र सरकार, खासकरून अर्थमंत्र्यांच्या विरोधात जाहीर भोलत आहेत. शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरीसुद्धा यांनी विरोधात बोलण्यास सुरुवात केली. भाजपचे अनेक नेते नोटाबंदी आणि जीएसटीच्या विरोधात खासगीत बोलतात. मध्यंतरी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हेसुद्धा विजयादशनीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालकांच्या भेटीसाठी नागपूरला येऊन गेले. रुडी त्यांचेच खंदे समर्थक समजले जातात. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते नागरी विमान वाहतूक मंत्री होते.

नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना रुडी महाराष्ट्राचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक झाली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांना हटविण्यात आल्याने रुडी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
काल सायंकाळी एन. चंद्राबाबू नायडू यांचे नागपुरात आगमन झाले व त्यांनीही गडकरींची भेट घेतली. काल झालेल्या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मोदी सरकारविरुद्ध सुरू झालेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख