`राष्ट्रवादी'चे नेते संदीप बाजोरीया यांच्या घरावर छापे 

`राष्ट्रवादी'चे नेते संदीप बाजोरीया यांच्या घरावर छापे 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार संदीप बाजोरीया 25 लाख रुपयांसह विमानतळावर आढळल्याने चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

यवतमाळ/नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार संदीप बाजोरीया 25 लाख रुपयांसह विमानतळावर आढळल्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. 

प्राप्तीकर विभागाने यवतमाळ येथील बाजोरीया यांच्या घरी व कार्यालयावर छापे मारून चौकशी केली. 

विदर्भात माजी आमदार संदीप बाजोरीया ही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडी असामी मानली जाते. गोसेखुर्दसह इतर सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या `एसीबी'च्या आरोपींमध्ये बाजोरीया यांचीही फर्म आहे. संदीप बाजोरीया सुद्धा यात एक आरोपी आहेत. 

संदीप बाजोरीया 25 लाख रुपये घेऊन नागपूरहून मुंबईला गेले. बाजोरीया यांच्या बॅगमध्ये 25 लाख रुपयांची रोकड असल्याचे विमानतळांवर असलेल्या एक्‍सरे मशीनमध्ये निदर्शनास आले. 

विमानतळाची सुरक्षा करणाऱ्या `सीआयएसएफ'च्या जवानांनी ही बाब मुंबईतील `सीआयएसएफ'ला दिली. 

संदीप बाजोरीया मुंबईच्या विमानतळावर उतरल्यानंतर `सीआयएसएफ'ने बाजोरीया यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्या बॅगमध्ये 25 लाख रुपयांचे रोख रक्कम आढळून आली.

मुंबईत एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी ही रक्कम नेत असल्याचा दावा बाजोरीया यांनी केला. एवढी मोठी रक्कम रोकड मिळाल्याने `सीआयएसफ'ने इन्कम टॅक्‍स विभागाला कळविले. इन्कम टॅक्‍स विभागाने तात्काळ यवतमाळ येथील बाजोरीया यांच्या घरी व कार्यालयावर छापे मारले. या छाप्यातून नेमकी कोणती माहिती मिळाली, हे अद्याप कळले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com