विजया रहाटकरांची नागपुरातली पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न

विजया रहाटकरांची नागपुरातली पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न

नागपूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज नागपुरात केला. महिला कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेच्या सभागृहाबाहेर ढोल वाजविण्यास सुरूवात केल्याने रहाटकरांना पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली. विजया रहाटकर यांनी आज दुपारी 1 वाजता रविभवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या आल्या. या निदर्शकांचे नेतृत्व अलका कांबळे करीत होत्या. 

नागपुरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आधी बोला, मग राज्याची माहिती द्या, अशा घोषणा देण्यास या महिला कार्यकर्त्यांनी सुरूवात केली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे या महिला कार्यकर्त्या घोषणा देत होत्या. विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेच्या बाहेर येऊन महिलांशी संवाद साधला. आपल्या समस्या काय आहेत, त्या सांगा. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगण्याचा प्रयत्न रहाटकर यांनी केला. 

परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी नागपुरात महिला असुरक्षित आहे, त्याबद्दल पहिल्यांदा बोला. रहाटकरांनी महिलांच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार करीत असून त्यासंदर्भात संबंधितांना आपण आवश्‍यक सूचना देऊ, असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलांनी पुन्हा ढोल वाजविण्यास सुरूवात केल्याने रहाटकरांनी पत्रकार परिषदच आटोपती घेतली. 

राष्ट्रवादीच्या महिलांचा स्टंट- रहाटकर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा स्टंट प्रसिद्धीसाठी आहे. या महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला. त्यांच्या भावनांशी मी संपूर्णपणे सहमत आहे.परंतु कोणत्याही समस्या चुटकीसरशी सुटत नसतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्ष महिलांना भेटतही नव्हत्या. आम्हाला काम करायचे आहे अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com