`नाणार'वरून शिवसेनेने बदला घेतला? 

`नाणार' प्रकरणावरून शिवसेना सदस्यांमध्ये असलेली खदखद आज समोर आली. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा आवाज दाबण्याचा नेहमी प्रयत्न केला. त्याचा बदला आज शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत काढला. सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी राजदंड पळविण्याची अभूतपूर्व घटना आज विधानसभेत घडली.
`नाणार'वरून शिवसेनेने बदला घेतला? 

नागपूर ; `नाणार' प्रकरणावरून शिवसेना सदस्यांमध्ये असलेली खदखद आज समोर आली. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा आवाज दाबण्याचा नेहमी प्रयत्न केला. त्याचा बदला आज शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत काढला. सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी राजदंड पळविण्याची अभूतपूर्व घटना आज विधानसभेत घडली. 

कोकणात नाणार येथे रिफायनरी सुरू करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. या संदर्भात जारी झालेली अधिसूचना रद्द करण्याची घोषणा सुभाष देसाईंनी केली होती. परंतु तात्काळ मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योगमंत्र्यांना नाही, असे सांगितले. बुधवारी विधान परिषदेतही नाणारवर लक्षवेधी सूचना असताना उद्योगमंत्री सुभाष देसाईंना उत्तर देऊ दिले नाही व मुख्यमंत्र्यांनी स्वतःच या लक्षवेधीला उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावरून शिवसेनेची नस वारंवार दाबली होती. यामुळे शिवसेना सदस्यांमध्ये असंतोष होता. 

विधान भवन परिसरात आज सकाळपासून शिवसेना सदस्य विधानसभेत नाणारवरून गोंधळ घालण्याची भाषा करीत होते. प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर शिवसेना सदस्य उभे राहून बोलू लागले. परंतु 293 च्या चर्चेला उत्तर झाल्यानंतर बोला, असे सांगून विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सेना सदस्यांना शांत केले. या चर्चेनंतर पुन्हा शिवसेना सदस्य आक्रमक झाले. नाणार रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत शिवसेना सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. परंतु राजदंड पळविण्यापर्यंत मजल जाईल, असे कुणालाही अपेक्षित नव्हते. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची केलेल्या कोंडीमुळे सेनेने हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com