nagpur-ma-go-vaidya-mohan-bhagwat-RSS-meet-delhi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मा. गो. वैद्य म्हणतात, भागवतांचे भाषण ऐकले नाही! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण आपण ऐकलेच नाही, अशी सावध प्रतिक्रिया रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केली.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण आपण ऐकलेच नाही, अशी सावध प्रतिक्रिया रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केली.
 
रा. स्व. संघाने दिल्लीत आयोजित केलेल्या "भविष्यातील भारत- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोण' या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेसच्या योगदान मान्य केले. तसेच कॉंग्रेसने देशाला अनेक महापुरुष दिले, याचा आदरयुक्त उल्लेखही केला. डॉ. भागवत यांच्या या वक्तव्यांना प्रसिद्धी माध्यमांमध्ये बरीच जागा मिळाली आहे.
 
या संदर्भात संघ परिवारात काय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी `सरकारनामा'ने ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांच्याशी संपर्क साधला. डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणावर आपली काय प्रतिक्रिया आहे, असे विचारले असताना मा. गो. वैद्य म्हणाले, "भागवतांचे भाषण मी ऐकले नाही. त्यांचे भाषण मी उद्या ऐकेन व त्यानंतर त्यावर मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन.'' 

डॉ. भागवतांचे हे भाषण जवळपास सर्व चॅनेल्सवर लाईव्ह दाखविले जात होते. तसेच रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावरही काही तासामध्येच डॉ. भागवतांचे भाषण हिंदीमध्ये उपलब्ध झाले होते, हे विशेष.

संबंधित लेख