nagpur-india-day-parade-new-york | Sarkarnama

न्यूयॉर्कमधील `इंडीया डे परेड'मध्ये शिवछत्रपती चित्ररथ 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा उपक्रम गेल्या रविवारी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडीसन एव्हेन्यू येथे झाला. या कार्यक्रमात काही मराठी युवकांनी पहिल्यांदाच छत्रपती चित्ररथ तयार केला. यावेळी मराठी युवक-युवतींनी केलेल्या लेझीम नृत्याने साऱ्यांचे लक्ष आकर्षित केले होते. तेथील एका वर्तमानपत्राने या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट अशा शब्दात गौरविले. 

नागपूर : न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा उपक्रम गेल्या रविवारी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडीसन एव्हेन्यू येथे झाला. या कार्यक्रमात काही मराठी युवकांनी पहिल्यांदाच छत्रपती चित्ररथ तयार केला. यावेळी मराठी युवक-युवतींनी केलेल्या लेझीम नृत्याने साऱ्यांचे लक्ष आकर्षित केले होते. तेथील एका वर्तमानपत्राने या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट अशा शब्दात गौरविले. 

न्यूयॉर्कमधील मॅडिसन एव्हेन्यू परिसरात भारतीय संस्कृती व परंपरांना अधोरेखित करणारे देखावे, चित्ररथ, लोकसंगीत व नृत्य सादर केले जातात. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांनी एकत्रित येऊन हा चित्ररथ तयार केला. या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची भूमिका करणारे युवक दाखविण्यात आले. दुसऱ्या एका देखाव्यात जिजाऊ बाळ शिवाजींना मार्गदर्शन करताना दाखविले आहे. या चित्ररथासोबत अल्बानी येथून 100 युवक ढोल-ताशा व लेझीम पथक आले होते. यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेचा एक आगळावेगळ्या अनुभवाचा आस्वाद अमेरिकेतील भारतीयांना घ्यायला मिळाला. शिवाजी महाराजांच्या चित्ररथाचे "न्यूयॉर्क परेड लाइफ' या वृत्तपत्राने सर्वोत्कृष्ट रथ म्हणून कौतुक केले. 

छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक स्वप्नील खेडेकर, विनोद झेंडे, लेझीम पथकाचे कल्याण घुले यांच्या मार्गदर्शनात हा चित्ररथ तयार करण्यात आला. यावेळी तिरंगा घेऊन न्यूयॉर्क स्टेट युवती अध्यक्ष अलिशा मर्चंट होत्या. या उपक्रमासाठी गौरव दळवी, रूपेश नाईक, प्रशांत भुसारी, शिल्पा घुले, रोहन रायगुडे, अभिनव देशमुख, ऋषिकेश माने, शरद कोट्टा, किशोर गोरे, दिलीप म्हस्के, राजेंद्र गाडे, जगदीश सोळंकी, संदीप जाधव, अनिल कुलकर्णी, भूषण पाटील, मुकुंद खिस्ती, कल्याण तावरे आदींनी योगदान दिले.  
 

संबंधित लेख