nagpur-divisional-commissioner-anupkumar-transfer | Sarkarnama

नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

गेल्या चार वर्षांपासून नागपूर विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे अनुपकुमार यांची अखेर आज मुंबईत बदली झाली. राज्याच्या कृषी, दुग्धव्यवसाय व मत्स्य खात्याचे प्रधान सचिव म्हणून ते रुजू होणार आहेत.

नागपूर : गेल्या चार वर्षांपासून नागपूर विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे अनुपकुमार यांची अखेर आज मुंबईत बदली झाली. राज्याच्या कृषी, दुग्धव्यवसाय व मत्स्य खात्याचे प्रधान सचिव म्हणून ते रुजू होणार आहेत.
 
गेल्या काही वर्षात नागपूर विभागीय आयुक्त म्हणून ते सर्वाधिक काळ राहिले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते नागपूर विभागाचे आयुक्त म्हणून होते. अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. परंतु त्यांची बदली झाली नव्हती. 

विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी पदभार न स्वीकारल्याने या मंडळाचा कार्यभारही अनुपकुमार यांच्याकडेच होता. या मंडळाच्या एका सदस्यांसोबत त्यांचे नुकतेच मतभेदही उघड झाले होते. यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांची विभागीय आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे.

संबंधित लेख