nagpur-devendra-fadanvis-nana-patole  | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

पंढरपूरला हिंसा होण्याचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य निषेधार्ह : नाना पटोले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 जुलै 2018

पंढरपूरला मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे हिंसा होण्याची शक्‍यता असल्याने महापूजा न करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती निषेधार्ह असल्याचे ट्विट प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे. 

नागपूर : पंढरपूरला मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे हिंसा होण्याची शक्‍यता असल्याने महापूजा न करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती निषेधार्ह असल्याचे ट्विट प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे. 

दरवर्षी आषाढी एकादशीला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना मिळतो. दरवर्षी मुख्यमंत्री सपत्नीक महापूजा करतात. यावर्षी मराठा आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी पूजा करू न देण्याचा इशारा दिला होता. यावरून पंढरपुरात चेंगराचेंगरी तसेच सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी भीती असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या निर्णयावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी टीका केली. या संदर्भात ट्विट करून नाना पटोले म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लोक पंढरपुरात येतात. तेथे कधीही चेंगराचेंगरी झाली नाही. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने शांततेत पार पडले. या शांती मोर्चाची देशभरातच नव्हे तर जगातील प्रसारमाध्यांमध्ये प्रशंसा झाली आहे. ही वस्तुस्थिती असताना मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे हिंसा करतील, अशी भीती दाखविणे हे चुकीचे तसेच निषेधार्ह असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
 

संबंधित लेख