nagpur developement | Sarkarnama

नागपुरात सिमेंट रस्त्यांची "पोलखोल' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

शहरात अनेक सिमेंटचे रस्ते होत आहेत. त्यापैकी रस्त्यांचे काम पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नातेवाइकांना मिळाल्याचे समजते. बावनकुळे यांचे व्याही आष्टनकर यांना 90 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाल्याचे समजते. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूर शहरात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम "कामचलाऊ' असल्याचे एका संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बांधकाम निकृष्ट झाल्याचे मान्य केले आहे. 

नागपूर शहरात मुख्य रस्ते, उपरस्ते, गल्लीतील रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नागपुरात प्रत्येक रस्ता खोदलेला दिसून येतो. एक वर्षापासून सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. या बांधकामामुळे लोकांना त्रास होत आहे. परंतु रस्ते होणार असल्याने लोक हा त्रास सहन करीत आहेत. 

जनमंच या संस्थेने या सिमेंट रस्त्यांची पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष ऍड. अनिल किलोर यांच्या पथकाने शहरातील सर्वच सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाच्या दर्जाचा अभ्यास केला. यात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झाल्याचे दिसून आले. अनेक रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. याची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळेंनीही ही बाब मान्य केली. त्याचवेळी पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आश्‍विन मुदगल यांना बोलावून रस्त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. 

 

संबंधित लेख