Nagpur crime | Sarkarnama

नागपुरात नेत्याच्या कन्येला अश्‍लील संदेश 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुण्यात भाजप आमदाराच्या कन्येवर जीवघेणा हल्ला झाला आहे. हे प्रकरण ताजे असताना नागपुरात दोन युवकांनी फेसबुक पेजवर नागपुरातील एका नेत्याच्या मुलीला अश्‍लील संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

नागपूर : पुण्यात भाजप आमदाराच्या कन्येवर जीवघेणा हल्ला झाला आहे. हे प्रकरण ताजे असताना नागपुरात दोन युवकांनी फेसबुक पेजवर नागपुरातील एका नेत्याच्या मुलीला अश्‍लील संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सारंग रामटेके व छत्रपती करडभाजने हे या युवतीचे फेसबुक फ्रेंड आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही या युवतीला अश्‍लील संदेश पाठवित आहे. हे संदेश येणे सुरूच राहिल्याने युवतीने वडिलांकडे तक्रार केली. या नेत्याने कोराडी पोलिस ठाण्यात या दोन युवकांविरुद्ध सायबर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. 

या दोघांविरुद्ध विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी कोराडीतील नाहीत. एक आरोप कुही व दुसरा भूगाव येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनंतरही आरोपी युवकांना पोलिस पकडू शकलेले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून फार तातडीने कारवाई झालेली नसल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित लेख