nagpur congress | Sarkarnama

नागपूर कॉंग्रेसचे "जम्बो' शिष्टमंडळ आभारासाठी दिल्लीला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना कॉंग्रेस पक्षातून काढल्याने पक्षश्रेष्ठीचे आभार मानण्यासाठी नागपूर शहर कॉंग्रेसचे 40 जणांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारला दिल्लीला रवाना झाले. या भेटीत ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना कॉंग्रेस पक्षातून काढल्याने पक्षश्रेष्ठीचे आभार मानण्यासाठी नागपूर शहर कॉंग्रेसचे 40 जणांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारला दिल्लीला रवाना झाले. या भेटीत ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर ही कारवाई रद्द करावी, यासाठी चतुर्वेदी-राऊत गटाने दिल्लीत ठाण मांडले होते. या गटाने कॉंग्रेस खजिनदार मोतीलाल व्होरा, खासदार कमलनाथ यांची भेट घेतली. परंतु व्होरा यांनी प्रदेश कॉंग्रेसने केलेल्या कारवाईनंतर फार काही करता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने नाराज झालेले चतुर्वेदी व नितीन राऊत अखेर नागपुरात परतले. 

चतुर्वेदी यांना काढल्याने शहर कॉंग्रेसवर वर्चस्व असलेल्या विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे गटाची अनेक महिन्यांची मागणी मान्य झाली. जवळपास एक वर्षानंतर चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने आनंदीत झालेल्या मुत्तेमवार-ठाकरे गटाने आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन शक्तीप्रदर्शन करणार आहे. नागपूर शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक मतदारसंघातील सहा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुत्तेमवार व ठाकरे दिल्लीला रवाना झाले. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न होणार आहे. हे शिष्टमंडळही मोतीलाल व्होरा, राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेणार आहे. दिल्लीतील नेत्यांपुढे शक्तीप्रदर्शन करून चतुर्वेदींसाठी दार उघडू नका, अशी मागणी आग्रहाने मांडली जाणार असल्याचे समजते. 

संबंधित लेख