nagpur-bjp-gives-entries-to-criminals | Sarkarnama

नागपूरचे वजन वापरत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना भाजपात प्रवेश

प्रकाश बनकर 
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या इनकमिंग मध्ये येणाऱ्यांचा पार्श्‍वभूमी न बघता प्रवेश देण्याचा सपाटा सुरु आहे. यामूळे पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांनाही सहज प्रवेश मिळत असल्याची बाब शनिवारी (ता.24) औरंगाबादेत समोर आली आहे. 

औरंगाबाद : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या इनकमिंग मध्ये येणाऱ्यांचा पार्श्‍वभूमी न बघता प्रवेश देण्याचा सपाटा सुरु आहे. यामूळे पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांनाही सहज प्रवेश मिळत असल्याची बाब शनिवारी (ता.24) औरंगाबादेत समोर आली आहे. 

पोलिस रेकॉड नुसार गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असलेले राहुल चाबुस्कावरला भाजपात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने जाहिर प्रवेश देण्यात आला. या प्रवेशासाठी पदाधिकाऱ्यात नाराजीचा सुर असतानाही नागपुरचे वजन वापरण्यात आले असल्याने प्रदेशाध्यक्षासह पक्षातील निष्ठावंतात नाराजीचा सुर दिसून आला.
 
विविध कारणाने टिकेचे धनी ठरणाऱ्या भारतीय जनता पक्षात आता गुन्हेगारी स्वरुपाचे लोकांचा शिरकाव वाढत चालला आहे. शनिवारी पुंडलिकनगर रोडवरील तिरुमला मंगल कार्यालयात हा जाहिर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस रेकॉडनुसार चाबुकस्वारला गेल्या तडिपार करण्यात आले होते. यासह त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. असे असतानाही त्यांना पक्षात प्रवेश मिळल्यामूळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत. प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रमात गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश देत असल्याचे संदेश सर्वत्र जाऊ नयेत यासाठी इतर प्रवेशही एकाच वेळी करण्यात आले यात चाबुकस्वार सह सामाजात चांगली प्रतिमा असलेल्या राजेंद्र साबळे पाटील व इतर शेकडो कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. 

भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, नागपुरचे माजी आमदार मोहन मते, बंटी कुकडे, डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीज हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आलेल्यांनपैकी बहुतांश चाबुकस्वार यांना विरोध होता. मात्र केवळ राजेंद्र साबळे व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामूळे भाजपची ताकत वाढणार असल्यामूळे ही वरिष्ठ नेतेमंडळी प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमास आली असल्याची माहिती शहरा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिली. 

नागपुरचे वजनापुढे झुकले प्रदेशाध्यक्ष 
चाबुकस्वार यांना पक्षात प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नकार होता. यामूळे चाबुकस्वारने पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेतली. या प्रवेश सोहळ्यासाठी खास नागपुरहून माजी आमदार मोहन मते आले होते. श्री. मतेच्याच मदतीने हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रवेश होणार होता. अशा जाहिरातील शहरभर झळकविण्यात आल्या होत्या. मात्र दानवे यांनी या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शहरात दोन कार्यक्रमात अवर्जुन हजेरी लावली. पक्ष प्रवेशासाठी नकार असतानाही केवळ नागपुरचा होकार असल्यामूळे दानवेनाही झुकते माप द्यावे लागले. 

मुख्यमंत्र्यसोबत फोटो व्हायल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी राहुल चाबुकस्वार हे तडीपार होते. चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मिडियावरून व्हायरल झाले होते. यामूळे मुख्यमंत्र्यांनाही टिकेचे धनी व्हावे लागले होते. या भेटीनंतर आता थेट प्रवेश मिळाल्यामूळे निष्ठावंतात चर्चा सुरु झाली आहे. या प्रवेशा वेळी राहुल चाबुकस्वार म्हणाले, खोट्या गुन्हात अडकविण्यात आले हाते. दोन प्रकरणात निर्दोष सुटलो आहे. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामूळे मी या पक्षात प्रवेश करीत आहे.

संबंधित लेख