अमृता फडणवीसांना `आदर्श गावा'चा ध्यास 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावाचा विकासाचा ध्यास आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतला आहे. या गावाला आदर्श गाव करण्याचा आपला मानस असल्याचे अमृता फडणवीस यांनी बोलून दाखविला.
अमृता फडणवीसांना `आदर्श गावा'चा ध्यास 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावाचा विकासाचा ध्यास आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतला आहे. या गावाला आदर्श गाव करण्याचा आपला मानस असल्याचे अमृता फडणवीस यांनी बोलून दाखविला. 

नागपूरपासून जवळ असलेले फेटरी गाव मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. हे गाव दत्तक घेतल्यानंतरही काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने हे गाव चर्चेत आले होते. 

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर या गावाच्या विकासाच्या आघाडीवर सामसूम होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतल्यामुळे गावाचा खूप विकास होईल, अशी आशा गावकऱ्यांना आहे. या गावातील जिल्हा परिषदेची शाळा अद्यावत करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना फेटरी गावात प्रत्यक्ष भेटी देऊन कामांची पाहणी करणे शक्‍य नाही. 

या आश्‍वासनांचा व विकासाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आता अमृता फडणवीस यांनीच पुढाकार घेतला आहे. या भागाचे आमदार समीर मेघे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी आशा पठाण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी जि. प. शाळेच्या अद्यावत इमारतीचे भूमिपूजन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. या इमारतीवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपये खर्च होणार आहे. या गावाला राज्यातील आदर्श गाव करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या कामाची आढावा घेण्यासाठी आपण यापुढे वारंवार या गावात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्‍वासन गावकऱ्यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com