डॉ. आंबेडकरांना जगाच्या नकाशावर मोदींनी आणले : भिकाजी इदाते

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या नकाशावर आणले व त्यांची महती विदेशात झाल्याचे मत रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिकाजी इदाते यांनी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकरांना जगाच्या नकाशावर मोदींनी आणले : भिकाजी इदाते

नागपूर : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या नकाशावर आणले व त्यांची महती विदेशात झाल्याचे मत रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिकाजी इदाते यांनी व्यक्त केले.

नागपूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी बोलताना
ते म्हणाले, की मोदींना अनुचित जातींच्या लोकांबद्दल विशेष प्रेम आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना शासकीय घरात प्रवेश प्रथम एका दलित महिलेने केला होता. यातून त्यांची अनुसूचित जाती-जमातींकडे बघण्याची दृष्टी स्पष्ट होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचे ठरल्यानंतर त्यांनी माझ्या सूचनेचा सहर्ष स्वीकार केला. बाबासाहेबांशी संबंधित पाच स्थळांना पंचतीर्थाचा दर्जा देण्यात आला. यात महू, त्यांचे मूळ गाव आंबवडे, दिल्लीतील अलीपूर रोडवरील घर, इंग्लंडमधील घरांचा समावेश आहे. अलिपूर रोडवरील घराचे स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. हे केवळ मोदींमुळे शक्य झाल्याचे इदाते यांनी सांगितले.

देशातील भटक्या विमुक्त जमातींचा अभ्यास करून एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. हा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला असून यातील शिफारशींची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com