nagpur administration | Sarkarnama

नागपूरकर अधिकाऱ्यांचा "भरणा' 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

नागपूरमध्ये नागपूरकर अधिकाऱ्यांचा अधिकाधिक भरणा होत असून जिल्हाधिकारी, डीसीपीसारख्या महत्त्वाच्या पदांवर नागपूरकर अधिकारी काम करीत आहेत. 

नागपूर : नागपूरमध्ये नागपूरकर अधिकाऱ्यांचा अधिकाधिक भरणा होत असून जिल्हाधिकारी, डीसीपीसारख्या महत्त्वाच्या पदांवर नागपूरकर अधिकारी काम करीत आहेत. 

नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे नागपूरचेच आहेत. ते मूळचे उत्तराखंड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर कुर्वे यांना महाराष्ट्र कॅडरमध्ये आणण्यात आले. तेव्हापासून ते नागपुरातच आहेत. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या; परंतु कुर्वेंची बदली नागपूरबाहेर झाली नाही. काही दिवसांपूर्वीच पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या. यात नागपूरचेच नीलेश भरणे नागपुरात पोलिस उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. 

याशिवाय नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) शरद जिचकार नागपूरचेच आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी नागपूर ग्रामीणची जबाबदारी होती. त्यांच्या पत्नी नंदा जिचकार महापौर झाल्यानंतर त्यांना नागपूरची पूर्णवेळ जबाबदारी सोपविण्यात आली. नागपुरातील आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे या आयएएस अधिकारीही नागपूरकरच आहेत. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी)चे सभापतिपदही नागपूरकर आयएएस अधिकाऱ्याकडे आहे. दीपक म्हैसेकर यांना काही महिन्यापूर्वी नागपुरात आणण्यात आले. एनआयटी आता बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ते कदाचित एनआयटीचे अखेरचे सभापती ठरतील. नागपूर महापालिकेत अप्पर आयुक्त असलेले रवींद्र कुंभारेही नागपूरचे आहेत. 
 

संबंधित लेख