nagar udhhav thackrey attack on bjp | Sarkarnama

'छिंदम'छाप भाजपवर उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्ला! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खालच्या पातळीवर बोलणाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा पक्ष प्रमुख उदधव ठाकरे यांनी भाजचा समाचार घेतला. 

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खालच्या पातळीवर बोलणाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा पक्ष प्रमुख उदधव ठाकरे यांनी भाजचा समाचार घेतला. 

पारनेर येथे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ठाकरे बोलत होते. भाजपवर टीका करताना ठाकरे यांनी खरमरीत शब्दांत नेत्यांना टोले लगावले. 

ठाकरे म्हणाले, की निवडणुका जवळ आल्या की यांना छत्रपती आठवतात. इतर वेळी त्यांच्या नावाने खालच्या पातळीवर बोलण्याचे धाडस करतात. छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन चला मोदींना साथ देऊ, अशा घोषणा करून सत्तेवर आले. नंतर त्यांना छत्रपतींचा कां विसर पडतो, अशी टीका त्यांनी केली. 

सर्वांना मोफत घरे देऊ, असे म्हणणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका. आता तरी भानावर या. टाळ्या वाजवून जमणार नाही. स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला जागा दाखवून द्या. जिल्हा सहकारी बॅंकांना हे सरकार टाळे लावण्याची तयारी करीत आहे. आज बॅंका ओरबडून लोक पळून जात आहेत. पण सरकारला हे दिसत नाही. राज्याच्या व देशाच्या हितासाठी आम्ही भाजप सरकारबरोबर होतो. पण आता यापुढे बरोबर राहणार नाही. स्वबळावर निवडणुका लढवू. महाराष्ट्रावर शिवसेनेचाच झेंडा असेल, असे ठाकरे म्हणाले. 

संबंधित लेख