nagar udhhav thackre angry | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे चिडले; निलेश लंकेंना मुंबईला बोलावले! 

मुरलीधर कराळे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पारनेर येथील शेतकरी मेळाव्यादरम्यान गाड्यांवर झालेल्या दगडफेकीबाबत उद्या तालुकाध्यक्ष निलेश लंके यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. 

नगर : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पारनेर येथील शेतकरी मेळाव्यादरम्यान गाड्यांवर झालेल्या दगडफेकीबाबत उद्या तालुकाध्यक्ष निलेश लंके यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. 

पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी आले होते. या सभेवर निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांसह बहिष्कार घालण्याची भाषा केली होती. नंतर मात्र कार्यक्रमास ते उपस्थित राहिले. 

कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करून लंके यांचे शक्तीप्रदर्शन केले. कार्यक्रम आटोपून हॅलीपॅडकडे ठाकरे जात असताना या ताफ्यातील आमदार औटी यांच्या गाडीवर शिवसेनेच्याच एका गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करीत औटी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. ही दगडफेक लंके यांच्या कार्यकर्त्यांनीच केल्याची चर्चा सुरू झाली. याप्रकाराबाबत लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्याची शक्‍यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू झाली. याबाबत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेले कोरेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याचा फैसला उद्या होणार असल्याचे संकेत दिले. 

कोरेगावकर म्हणाले, उद्या याबाबत आमची मिटिंग आहे. ठाकरे यांची भेट लंके घेणार आहेत. माजी आमदार अनिल राठोड यांच्याही पायाला एका गाडीचा धक्का लागल्याचे समजते. याबाबत चौकशी करून नेमके काय झाले, याबाबत उद्या चर्चा होणार आहे. नंतर काय तो निर्णय होईल. परंतु झालेल्या या प्रकारामुळे ठाकरे चांगलेच चिडले, हे मात्र नक्की आहे. 

संबंधित लेख