सुवर्णा कोतकरांनी फोन केल्यानंतरच केडगाव हत्त्याकांडाचे आदेश मिळाले? 

केडगाव दुहेरी हत्याकांडाची पाळेमुळे भानुदास कोतकर यांच्या घरात असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. आता कॉग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा कोतकर यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे. हत्याकांडाच्या दिवशी सुवर्णा व सासरे भानुदास कोतकर यांच्यात संभाषण झालेले असल्याने त्या चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहेत.
सुवर्णा कोतकरांनी फोन केल्यानंतरच केडगाव हत्त्याकांडाचे आदेश मिळाले? 

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाची पाळेमुळे भानुदास कोतकर यांच्या घरात असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. आता कॉग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा कोतकर यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे. हत्याकांडाच्या दिवशी सुवर्णा व सासरे भानुदास कोतकर यांच्यात संभाषण झालेले असल्याने त्या चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहेत. 

दरम्यान सुवर्णा या माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी तसेच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या आहेत. 

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य सूत्रधार कॉग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो बोलू लागला आहे. त्याच्या सांगण्यानुसार भानुदास कोतकर याच्या घरीच या गुन्ह्याचे पाळेमुळे असल्याचे पुढे येत आहेत. या प्रकरणी सुवर्णा कोतकर यांच्यात व त्यांचे सासरे भानुदास कोतकर यांच्यात झालेले संभाषण तसेच भानुदास कोतकर व विशाल कोतकर यांच्यात झालेले संभाषण महत्त्वाचे ठरणार आहे. 

आधीच लांडे खून प्रकरणामुळे सुवर्णा कोतकर यांचे सासरे असलेले भानुदास कोतकर, पती माजी महापौर संदीप कोतकर तसेच इतर दोन दीर कारागृहात आहेत. अशाही परिस्थितीत त्या नगरसेवक म्हणून या कुटुंबियांचा राजकीय वारसा चालवित आहेत. त्याचाच भाग म्हणून भानुदास कोतकर यांचा पुतण्या विशाल याला केडगाव पोटनिवडणुकीत विजयासाठी सुवर्णा कोतकर यांनी शर्थिचे प्रयत्न केले. प्रभात घरोघरी जावून मतांचा जोगवा मागितला. परंतु आता त्याही अडचणीत सापडल्या आहेत. 


सुवर्णा कोतकरचे झाले संभाषण 

विशाल कोतकरच्या सांगण्यानुसार केडगाव येथे सात एप्रिल रोजी सायंकाळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली, त्या दिवशी संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यात फोनवर वाद झाला. कोतकर यांनी थांब, घरी घेऊन तुझा बेत पाहतो, अशी धमकी खोल्लम याला दिली. खोल्लम याने विशाल कोतकर याच्या घरी जावून हे संभाषण झाल्याचे रेकॉर्डिंग विशाल कोतकर याला ऐकविले. त्यानंतर हे दोघेही भानुदास कोतकर यांच्या घरी गेले. तेथे हे रेकार्डिंग कोतकर यांच्या स्नुषा नगरसेविका सुवर्णा कोतकर यांना ऐकविले.

सुवर्णा यांनी हा प्रकार जिल्हाबंदी असलले सासरे भानुदास कोतकर यांना फोनवरून सांगितला. त्या वेळी मुंबईत असलेल्या भानुदास कोतकर व विशाल कोतकर यांच्यात बोलणे झाले. त्यानंतर विशाल कोतकर याने आरोपी संदीप गुंजाळ याला फोन करून खोल्लमच्या घरी जाण्यास सांगितले. गुंजाळ हा खोल्लमच्या घरी गेल्यानंतर पुन्हा विशाल कोतकर सोबत फोनवर बोलणे झाले. त्या वेळी गुंजाळ याला खोल्लमचा काय विषय आहे, तो संपून टाक असे सांगितल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com