nagar-south-seat-ashok-chavan-to-meet-sharad-pawar | Sarkarnama

नगर दक्षिण लोकसभेची जागा कॉंग्रेसला मिळण्यासाठी शरद पवारांना भेटणार : अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मागील अनेक वर्षांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्यात मित्रपक्षाला (राष्ट्रवादी) यश आले नाही. आता ही जागा कॉंग्रेसला मिळविण्यासाठी एक शिष्टमंडळ तयार करणार आहे, असे सुतोवाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

नगर : मागील अनेक वर्षांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्यात मित्रपक्षाला (राष्ट्रवादी) यश आले नाही. आता ही जागा कॉंग्रेसला मिळविण्यासाठी एक शिष्टमंडळ तयार करणार आहे, असे सुतोवाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डी येथे झाला. या वेळी चव्हाण यांनी कॉंग्रेसची जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जनसंघर्ष यात्रा सकाळी संगमनेर येथे आली. तेथे सभा झाल्यानंतर लोणी येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगरमध्ये रॅली काढून ही यात्रा पाथर्डी येथे गेली. तेथे यात्रेचा समारोप झाला.

उपस्थित नेत्यांनी भाजप सरकारवर सडाडून टीका केली. जीएसटी, नोटाबंदी, पेट्रोल दरवाढ, महागाई, बेरोजगारी आदी मुद्यांवरून भाजप सरकारला खेचा, असे आवाहन सर्वच नेत्यांनी केले.

संबंधित लेख