Nagar south Loksabha will be contested by NCP : Rajendra falke | Sarkarnama

नगर दक्षिण लोकसभा राष्ट्रवादीचं लढवणार : राजेंद्र फाळके 

सरकारनामा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

 नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीचीच होतीआगामी काळातही राष्ट्रवादीचीच राहील..

- राजेंद्र फाळके

नगर : "  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीचीच होतीआगामी काळातही राष्ट्रवादीचीच राहील.काॅग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत या जागेत आता बदल नाही," असे ठासून सांगत राष्ट्रवादी काॅग्रेसचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या विषयाला पूर्णविराम दिला आहे.

फाळके यांनी पत्रकारांशी बोलताना ही जागा राष्ट्रवादीचीच राहणार असल्याचे सांगितलेते म्हणाले, " नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहेआगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे एक बुथ दहा युथ अशी संकल्पना राबविणार आहेपक्षसंघटन वाढविण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांत सर्व नेत्यांशी बोलून बुथ कमिटी तयार करण्यात येईल."

पक्षाच्या जिल्हा  कार्यालयात आठवड्यातील तीन ते चार दिवस थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जातीलआघाडीसंदर्भात निर्णय पक्षश्रेष्ठी घेतीलपक्षाच्या जिल्हा कार्यालयात आठवड्यातील तीन ते चार दिवस थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जातीलकळसुबाई ते सिद्धटेक परिसर "राष्ट्रवादी काॅग्रेसमय करणार आहोतपक्ष हा कुटुंबाप्रमाणे आहेकुटुंबातील वाद कुटुंबातच राहतीलपक्ष एकसंघ राहिलअसे फाळके म्हणाले.

' महापालिकेत सत्ता राष्ट्रवादी काॅग्रेसचीच येणार आहेपक्ष संघटन वाढविण्यासाठी आमदार संग्राम जगताप व शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते हे शहरातील कार्यकर्त्यांची फळी वाढवित आहेतत्यामुळे आगामी काळात महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे ,"असेही  फाळके म्हणाले.

विरोधी पक्षाला हादरा देणार

गोळाबेरीज करण्याची शिकवण शरद पवार यांची आहेत्यानुसार पक्षातून नाराज होऊन गेलेले नेते व कार्यकर्ते पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारआहेआता विरोधी पक्षांना हादरा देण्याचे काम केले जाईल. 

 कर्जत तालुक्याला दोन महत्त्वाची पदे मिळालीयाबाबत फाळके म्हणाले, "सक्षमपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात कायम संधी मिळतेमहिला जिल्हाध्यक्षा चांगले काम करीत आहेतत्यामुळे त्यांना संधी मिळाली आहे . "

 

 

संबंधित लेख