Nagar Sand Mafia | Sarkarnama

वाळुतस्कराच्या 'सातबारा'वर चढविला दोन कोटींचा बोजा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

श्रीरामपूर तालुक्‍यातील मालुंजे बुद्रूक येथील कामगार तलाठी बाबासाहेब पंडीत यांना वाळूतस्कराने कार्यालयात घुसून मारहाण करत त्यांचा लॅपटॉप फोडल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विश्‍वजीत उर्फ बच्चू दिनकर बडाख याने वाळूतस्करी केल्याप्रकरणी महसूल खात्याने त्याच्या सातबारा उताऱ्यावर एक कोटी 96 लाख 14 हजार 425 रुपये बोजा चढविलेला आहे.

नगर : तलाठ्याला दमदाटी करून त्याचा लॅपटॉप फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका वाळुतस्कराच्या सात-बारा उताऱ्यावर दंडापोटी तब्बल सुमारे दोन कोटींचा बोजा चढविण्यात आला आहे. असे असूनही त्याची वाळुचोरी सुरूच असल्याने त्याचे पाच डंपरही पोलिसांनी जप्त केले आहेत.

श्रीरामपूर तालुक्‍यातील मालुंजे बुद्रूक येथील कामगार तलाठी बाबासाहेब पंडीत यांना वाळूतस्कराने कार्यालयात घुसून मारहाण करत त्यांचा लॅपटॉप फोडल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विश्‍वजीत उर्फ बच्चू दिनकर बडाख याने वाळूतस्करी केल्याप्रकरणी महसूल खात्याने त्याच्या सातबारा उताऱ्यावर एक कोटी 96 लाख 14 हजार 425 रुपये बोजा चढविलेला आहे.

त्यानंतरही त्याच्याकडून अवैध वाळू वाहतूक सुरू असून, गेल्या वर्षभरात वेळोवेळी त्याची वाळुची वाहने पकडण्यात आली. त्यातील पाच डंपर बेलापूर पोलिस चौकीत जप्त आहेत. त्याचा राग धरून बच्चू बडाख याने गुरुवारी दुपारी कार्यालयात घुसून शिवीगाळ, दमदाटी व धक्‍काबुक्‍की करीत कार्यालयाच्या कामकाजाचा लॅपटॉप फोडला. या प्रकारामुळे वाळुतस्करीबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित लेख