छिंदमच्या  घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी सुरक्षेसाठी केला बंद

दरम्यान छिंदमचे याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याने आज चार जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Chindam house protection
Chindam house protection

नगर : श्री छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरल्याने जनतेच्या रोषाला बळी पडलेल्या  श्रीपाद छिंदम याचवरील शिवप्रेमींचा राग अजुन्हाई कमी झालेला नाही , असे दिसते . छिंदमचे  याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याने आज खबरदारीचे उपाय म्हणून   छिंदम याच्या दिल्लीगेट येथील घराकडे व कार्यालयाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत.

दरम्यान छिंदमचे  याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याने आज चार जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छिंदम याने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला काम सांगताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे शिवसेना व इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याचे कार्यालय फोडले. छिंदम याला अटक होऊन त्याची रवानगी नाशिकच्या जेलमध्ये करण्यात आली. मात्र युवकांचा रोष कमी झाला नाही. तीन दिवसांपासून जिल्हाभर आंदोलने सुरूच आहेत.

काल छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. या परिसरात पोलिस संरक्षण असतानाही झालेल्या या प्रकारामुळे जादा पोलिस कुमक मागविण्यात आली. काल कार्यालय जाळण्याच्या प्रकाराबाबत पोलिस काॅन्टेबल बिलाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात बंटी राऊत यांच्यासह चार अनोळखी व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, दिल्लीगेटजवळील छिंदम याच्या घराकडे व कार्यालयाकडे जाणारा रस्ता आज पोलिस व्हॅन आडवी लावून बंद ठेवण्यात आला. मोटारसायकली व पायी जाणाऱ्यांनाही मज्जाव केला जात होता. घर व कार्यालयासमोर पोलिस ठाण मांडून होते. शिवजयंतीनिमित्त येणाऱ्या रॅली व युवकांच्या मोटारसायकल रॅलीवरही पोलिस लक्ष ठेवून होते. जिल्ह्यातील शिवजयंती दरम्यान सतर्कतेचे आदेश पोलिसांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com