nagar-radhakrishna-vikhe-patil-morcha | Sarkarnama

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी आज कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा निघाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या मोर्चात भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. कॉंग्रेस नेत्यांनी भाजप विरोधात आगपाखड करीत जोरदार घोषणाबाजी केली.

नगर : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी आज कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा निघाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या मोर्चात भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. कॉंग्रेस नेत्यांनी भाजप विरोधात आगपाखड करीत जोरदार घोषणाबाजी केली.

माळीवाडा बसस्थानकाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. मार्केटयार्डमार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये विखे पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रदेश सदस्य विनायकराव देशमुख तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

भाजप सरकारने जीएसटी, नोटाबंदी करून सर्वसामान्यांचे हाल केले. आता पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून महागाईला निमंत्रण दिले आहे. आधीच महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन कॉंग्रेस नेत्यांनी केले.

संबंधित लेख