nagar-parner-bajar-samiti-election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

पारनेर बाजार समिती सभापतिपदाचा चेंडू अजितदादांच्या कोर्टात

मुरलीधर कराळे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला, पण त्यासाठी शिवसेनेची मदत घेण्यात आली. हा विषय राष्ट्रवादी पक्षांतर्गत असल्याने याबाबत अंतीम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या (ता. २०) याबाबत सुजित झावरे मुंबईत पवार यांना भेटणार आहेत.

नगर : पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला, पण त्यासाठी शिवसेनेची मदत घेण्यात आली. हा विषय राष्ट्रवादी पक्षांतर्गत असल्याने याबाबत अंतीम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या (ता. २०) याबाबत सुजित झावरे मुंबईत पवार यांना भेटणार आहेत.

पारनेर बाजार समितीत राष्ट्रवादीच्या अंतर्गत नेतृत्त्वबदलावरून तालुक्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालकांपैकी १२ जणांना सभापती प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. तो अद्याप प्रशासकीय पातळीवर मंजुरीसाठी आहे. १२ पैकी आठ संचालक राष्ट्रवादीचे, एक कॉंग्रेसचा व तीन शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादीचे नेते झावरे यांनी शिवसेनेच्या औटी यांची मदत घेवून तीन संचालक मिळविले. आणि गायकवाड यांच्याविरोधात अविश्वास दाखल केला.

गायकवाड दिलेला शब्द पाळत नाहीत : झावरे
प्रशांत गायकवाड यांना एक वर्षाचा सभापतीपदाचा कालावधी होता. मात्र आता दोन वर्षे झाली, तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे इतर संचालक नाराज झाले. त्यांची वारंवार होत असलेली मागणी व इतरांना संधी मिळावी, म्हणून आपण गायकवाड यांना राजीनामा देण्याचे सांगितले, परंतु ते पदाला चिकटून बसले आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अजिददादांशी याबाबत बोललो आहे. उद्या त्यांची मुंबईला भेट घेणार आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, तो आम्हास मान्य असेल, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सरकारनामा शी बोलताना सांगितले.

मी राजीनामा देणार नाही : गायकवाड
सुजीत झावरे यांनी पक्षांतर्गत राजकारण करून कार्यकर्त्यांची व नेत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची गरज नव्हती. तीन वर्षे मला बाजार समितीचे सभापतीपद देण्याचे ठरले होते. आता दोन वर्ष झाले. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मागील दोन वर्षांत मी शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक निर्णय घेतले. माझे काम चांगले आहे, हे वरिष्ठांनाही माहित आहे. अविश्वास ठराव दाखल झाला असला, तरी अद्याप तो मंजूर नाही. त्यामुळे मला भितीचे कारण नाही, असे प्रशांत गायकवाड यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख