nagar nilesh lanke statement | Sarkarnama

मीच पारनेरचा तालुका प्रमुख : निलेश लंके 

मुरलीधर कराळे 
बुधवार, 7 मार्च 2018

तूर्त थांबा, मला अद्याप पक्षाने कोणतेही पत्र दिलेले नाही. बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आहे, असे सांगून आपणच सध्या शिवसेनेचे पारनेरचे तालुकाप्रमुख आहोत, असे निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना सांगितले असल्याची चर्चा सोशल मीडियावरून जोरदारपणे सुरू आहे. 

नगर : तूर्त थांबा, मला अद्याप पक्षाने कोणतेही पत्र दिलेले नाही. बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आहे, असे सांगून आपणच सध्या शिवसेनेचे पारनेरचे तालुकाप्रमुख आहोत, असे निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना सांगितले असल्याची चर्चा सोशल मीडियावरून जोरदारपणे सुरू आहे. 

तसेच लंके यांचे कार्यकर्तेही तसे सांगत आहेत. याबाबत नव्याने नियुक्त झालेले तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी मात्र आपल्याला पक्षाचे नियुक्तीचे पत्र असल्याचे सांगून आपणच तालुकाप्रमुख आहोत, असे "सरकारनामा' शी बोलताना सांगितले. 

दरम्यान, याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी रोहोकले यांना तालुकाप्रमुख म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले. पारनेर तालुक्‍याचे तालुका प्रमुख म्हणून विकास रोहोकले यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. त्यामुळे पक्षवाढिसाठी ते आगामी काळात चांगले प्रयत्न करतील, असे गाडे यांनी सांगितले 

शिवसेनेने माझ्यावर पारनेर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे. पक्षाचे आदेश हे सामना मधून प्रसिद्ध होत असतात. आजच्या सामनामध्ये सदर बातमी प्रसिद्ध झाली आहे. शिवाय मला शिवसेनेच्या वतीने नियुक्तीचे पत्रही मिळाले आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करून तालुक्‍यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करणार असल्याचे विकास रोहोकले यांनी सांगितले. 

संबंधित लेख