भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठाकरेंचा आसूड

भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कोणत्याही पक्षांनी कर्जमाफीचे श्रेय घेऊ नये. कारण ते श्रेय संपकरी शेतकऱ्यांचेच आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर आसूड ओढला.
भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठाकरेंचा आसूड

नगर : भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कोणत्याही पक्षांनी कर्जमाफीचे श्रेय घेऊ नये. कारण ते श्रेय संपकरी शेतकऱ्यांचेच आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर आसूड ओढला.

पुणतांबे (ता. कोपरगाव) येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रायते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, अशोक विखे पाटील तसेच शेतकरी नेते धनंजय जाधव, डॉ. धनंजय धनवटे, धनंजय धोर्डे आदी या वेळी उपस्थित होते.

मानाचा मुजरा करण्यासाठी आलो
शेतकऱ्यांनी संप यशस्वी केला. मोठा लढा दिला. या शेतकऱ्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मी येथे आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरुन सोडणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. उर्वरीत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल, असे ठाकेर म्हणाले.

दोन्ही नेते एका माळेचे मनी
शेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे नेते आणि कोरडी धरणे भरण्यासाठी वादग्रस्त विधान करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हे एकाच माळेचे मणी आहेत. शेतकऱ्यांना शिव्या दिल्या, अन्याय केला, तरी ते काहीही करीत नाही, अशी त्यांची भावना झालेली आहे. परंतु या नेत्यांची मस्ती शेतकऱ्यांनी उतरविली, असे ठाकरे यांनी सांगून नेत्यांची खिल्ली उडविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com