Nagar news - Satyajit Tambe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सत्यजित तांबेंच्या ट्विटने उडाली खळबळ; रोख विखे-पाटलांवर? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 जुलै 2017

युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी परदेशातून केलेल्या ट्विटने नगर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात खळवळ उडाली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दहा मते फुटली आहेत, असा दावा त्यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. तर दुसऱया ट्विटमध्ये नगर जिल्ह्यातील दोन मते फुटली, असे म्हटले आहे. 

नगर : युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी परदेशातून केलेल्या ट्विटने नगर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात खळवळ उडाली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दहा मते फुटली आहेत, असा दावा त्यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. तर दुसऱया ट्विटमध्ये नगर जिल्ह्यातील दोन मते फुटली, असे म्हटले आहे. 

सत्यजित तांबे हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या ट्विटचा रोख विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे काय, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची दहा मते फुटली आहेत. त्यातील दोन आमदार नगर जिल्ह्यातील आहेत, अशी खात्रीशिर माहिती असल्याचे तांबे यांनी ट्विट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ते आमदार कोण, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या शक्यतेच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला नसतानाच तांबे यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. 

संबंधित लेख