Nagar news - Nimbodi mishap | Sarkarnama

नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निंबोडीतील दुर्घटना? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळून काल तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. इतर 13 जखमी झाले. इमारतीचे कामही नवीन असल्याचे सांगण्यात येते. स्लॅब कोसळण्याला बांधकाम निकृष्ठ असल्याला पुष्टी मिळते. मग या दुर्घटनेला जबाबदार कोण. निकृष्ठ काम करणारे ठेकेदार, दुर्लक्ष करणारे पदाधिकारी की निकृष्ठ काम सुरू असल्याचे पाहूनही मूग गिळून बसलेले ग्रामस्थ, असा प्रश्‍न आता पडला आहे. 

नगर : नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळून काल तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. इतर 13 जखमी झाले. इमारतीचे कामही नवीन असल्याचे सांगण्यात येते. स्लॅब कोसळण्याला बांधकाम निकृष्ठ असल्याला पुष्टी मिळते. मग या दुर्घटनेला जबाबदार कोण. निकृष्ठ काम करणारे ठेकेदार, दुर्लक्ष करणारे पदाधिकारी की निकृष्ठ काम सुरू असल्याचे पाहूनही मूग गिळून बसलेले ग्रामस्थ, असा प्रश्‍न आता पडला आहे. 

जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांच्या इमारतींची स्थिती बिकट झालेली आहे. गळके छत, शाळेत जाण्यासाठीच्या रस्त्यावर मोठमोठी डबके, भिंतीला तडे गेलेले, अशा स्थितीत अनेक शाळा आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक शाळेची ही स्थिती गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सांगतात. मात्र खर्च करायचा कोणी, हा प्रश्‍न पडतो. जिल्हा परिषदेचे प्रशासनही इमारत दुरुस्तीसाठी फारसे मनावर घेत नाहीत. स्थानिक लोकांनीच मदत करावी, असे धोरण असते. जेथे आपले पाल्य शिकतात, तेथील इमारत चांगली आहे की नाही, हे पाहण्याची तसदीही पालक घेत नाहीत. अशी ग्रामीण भागातील स्थिती अत्यंत धोकादायक आहे. 

तातडीने चौकशी करणार : विखे 
निंबोडी येथील शाळेत झालेला प्रकार दुर्दैवी आहे. याबाबत दोन दिवसांत चौकशी करून अहवाल मागवून घेऊ. शाळेचे बांधकाम निकृष्ट झालेले असेल व त्यात ठेकेदार दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करू. जखमी विद्यार्थ्यांचा वैद्यकीय खर्च जिल्हा परिषद करील, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी आज दिली. निंबोडी येथील शाळेच्या घटनास्थळी विखे पाटील यांनी भेट दिली. 

जिल्हा परिषद गांभिर्याने घेत नाही : कर्डिले 
जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषद गांभीर्याने घेत नाही. गतवर्षी शाळा दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीने दिला होता. मात्र, तो खर्च झाला नाही. याबाबत जिल्हा परिषदेला जाब विचारला पाहिजे. या घटनेला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी घटनास्थलाला भेट दिल्यानंतर केली. 

संबंधित लेख