Nagar news : collector's negative response to red lamp on car | Sarkarnama

नगर जिल्हाधिकाऱयांच्या गाडीवरील दिवा गेला; पाटी आली! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 जून 2017

पंतप्रधानांच्या आदेशानुसार मंत्र्यांचा, अधिकाऱ्यांचा लाल दिवा गेला. पण म्हणून काय झाले ? मस्त मोठ्या आकारात पाट्या तयार करण्याची स्पर्धाच अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये लागली. निर्णय काहीही होवो, पळवाटा आल्याच. आपली ओळख दाखविण्यासाठी काहीतरी युक्ती तर होणारच.

नगर : पंतप्रधानांच्या आदेशानुसार मंत्र्यांचा, अधिकाऱ्यांचा लाल दिवा गेला. पण म्हणून काय झाले ? मस्त मोठ्या आकारात पाट्या तयार करण्याची स्पर्धाच अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये लागली. निर्णय काहीही होवो, पळवाटा आल्याच. आपली ओळख दाखविण्यासाठी काहीतरी युक्ती तर होणारच.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वाहनांवरील दिवे काढले आहेत. मात्र, गाडी विशेष अधिकारी अथवा पदाधिकाऱ्याची आहे हे दर्शविणाऱ्या पाट्या आल्या आहेत. दिव्यांचा रुबाब गेला; मात्र गाड्यांची ओळख कायम ठेवण्यात येत आहे. यातून नगरचे जिल्हाधिकारीही सुटले नाहीत.
 
प्रधानमंत्री मोदी यांनी अधिकारी व पदाधिकारी हे जनतेतून आलेले व जनतेसाठीचे आहेत, हे दर्शविण्यासाठी त्यांच्या आलिशान गाड्यांवरील विशेषत्व दर्शक दिवे काढण्याचे आदेश दिले होते. यातून पोलिसांची वाहने व रुग्णवाहिका वगळण्यात आल्या होत्या. या आवाहनानुसार अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवरील विशेषत्व दर्शक दिवे काढून टाकले. 

वाहन कोणत्या अधिकारी अथवा पदाधिकाऱ्याचे आहे, हे दर्शविण्यासाठी विशिष्ट आकाराच्या पाट्या बसवून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हे अधिकारी व पदाधिकारी कोणत्या विभागातील व काय हुद्द्यावर आहेत, हे रस्त्यावरील नागरिकांना कळते. या पाट्या गाडीच्या पुढील बाजूस असलेल्या वाहन क्रमांक पाटीच्या वर बसविण्यात येतात.

संबंधित लेख