Nagar news - Chandrashekhar ghule | Sarkarnama

नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार भाजपवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

शेतीमालाला हमी भाव, पेट्रोलचे वाढते दर, वाढलेली महागाई, व्यापारी, शेतकरी यांचे विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. ५) एल्गार मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानितमित्ताने राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारवर हल्लाबोल करणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस गप्प बसणार नाही. आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी सांगितले.

नगर : शेतीमालाला हमी भाव, पेट्रोलचे वाढते दर, वाढलेली महागाई, व्यापारी, शेतकरी यांचे विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. ५) एल्गार मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानितमित्ताने राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारवर हल्लाबोल करणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस गप्प बसणार नाही. आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. हमाल भवनापासून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. तेथे अधिकाऱ्याना निवेदन देण्यात येणार आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी आता आक्रमक
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडून आलेल्या आदेशान्वये आता जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने आगामी काळात विविध आंदोलने केली जाणार आहेत. त्यातच अजित पवार यांना विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाची संधी मिळाल्यास ते सभागृह हालवून टाकणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे.

नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीमध्ये चैतन्य
कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसची संख्याबळ कमी होऊन राष्ट्रवादीकडे विरोधीपक्षनेते पद येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. त्यामुळे हा मोर्चा अधिक मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

संबंधित लेख