फडणवीस आणि विखे यांचे राधा-कृष्णासारखे प्रेम : बच्चू कडू 

सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून सरकारला नमविण्यासाठी शेतकरी येत्या 14 ऑगस्टला राज्यात "चक्का जाम' आंदोलन करणार आहेत. ही कर्जमाफी मान्य नाही. तीन वर्षांत शेतकऱ्यांना लुटले, त्यातलाच हिस्सा मागत आहोत. फडणवीस आणि विखे यांच्यातील प्रेम हे राधा-कृष्णासारखे आहे. त्यामुळे विरोधी पक्ष तरी राहिला आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली.
फडणवीस आणि विखे यांचे राधा-कृष्णासारखे प्रेम : बच्चू कडू 

नगर : सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून सरकारला नमविण्यासाठी शेतकरी येत्या 14 ऑगस्टला राज्यात "चक्का जाम' आंदोलन करणार आहेत. ही कर्जमाफी मान्य नाही. तीन वर्षांत शेतकऱ्यांना लुटले, त्यातलाच हिस्सा मागत आहोत. फडणवीस आणि विखे यांच्यातील प्रेम हे राधा-कृष्णासारखे आहे. त्यामुळे विरोधी पक्ष तरी राहिला आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली.
 
आम्ही कर्जमाफी नव्हे, लुटीचा परतावा मागत आहोत. कारण शेतकऱ्यांवर दरोडा घालणारे हे सरकार आहे. हे सरकार तिजोरीत हात घालण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खिशात हात घालत आहे, असे ते म्हणाले.
 
घोडेगाव (ता. नेवासे) येथे क्रांतिकारी शेतकरी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, सुकाणू समिती, शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित "एल्गार' मेळाव्यात आमदार कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आमदार भाई जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार शंकरराव गडाख, युवक नेते प्रशांत गडाख, क्रांतिकारी पक्षाचे सतीश पालवे, सभापती कडूबाळ कर्डिले, बाबा आरगडे, अंबादास कोरडे, भैयासाहेब देशमुख उपस्थित होते. 

चळवळीतले काही सूर्याजी पिसाळ 
आमदार जयंत पाटील म्हणाले, ""माजी आमदार शंकरराव गडाखांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. पुणतांब्यातील आंदोलन मागे घेण्याचे नाटक सरकारने केले, त्यात चळवळीतले काही सूर्याजी पिसाळ निघाले. शेतकऱ्यांच्या एकीमुळेच सरकारला नमते घ्यावे लागले. शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे सरकारचे धोरण आहे.'' 

ही तर संगनमताने लुबाडणूक 
माजी आमदार गडाख म्हणाले, ""तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताना इतरांना पोटशूळ का उठतो, असा प्रश्न आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com