Nagar news - Babanrao Pachpute Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : बबनराव पाचपुते

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

माजी गृहराज्यमंत्री बबनराव पाचपुते यांनी आठ निवडणुकांत सात चिन्हांचा वापर करीत निवडणुका जिंकल्या.

नाव – बबनराव भिकाजी पाचपुते
जन्म – ९ सप्टेंबर १९५४
गाव – काष्टी (ता. श्रीगोंदे, जि. अहमदनगर)
पक्ष – भारतीय जनता पक्ष
माजी गृहराज्यमंत्री बबनराव पाचपुते यांनी आठ निवडणुकांत सात चिन्हांचा वापर करीत निवडणुका जिंकल्या. सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची विधानसभेत नोंद आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी विधानसभा जिंकून विक्रम केला. १९७८ मध्ये काष्टी गणातून पंचायत समितीची निवडणूक त्यांनी जिंकली. तेथूनच पुढे त्यांची घोडदौड सुरू झाली. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाकडून उमेदवारी करीत जिंकली. याचदरम्यान श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणुकही जिंकली. तेथून त्यांनी राजकारणात पाय घट्ट रोवला. आपल्या भाषणाच्या खास शैलीत त्यांनी जनतेची मने जिंकली. पाचपुते यांनी नांगरधारी शेतकरी, जनता दलाचे चक्र, कॉंग्रेसचा पंजा, राष्ट्रवादीचे घड्याळ व अपक्ष म्हणून प्रेशर कुकर असे प्रत्येक वेळी वेगवेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. वयाच्या पन्नाशीनंतर धार्मिक कार्यात त्यांनी घेतलेला रस महाराज या उपाधीपर्यंत घेऊन गेला. आजही राजकारण्यातील महाराज म्हणून त्यांची ख्याती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख