nagar new meyor in action | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

निवड होताच महापौरांनी 'एक प्रश्न' सोडवला!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

कामगारांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

नगर: विजयी होऊन सभागृहाबाहेर येताच नूतन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी काम सुरू केले. महापालिकेसमोर कामगारांचे सुरु असलेले उपोषण सोडविण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेवून सोडवले.

महापालिकेसमोर गेल्या दोन दिवसांपासून कामगारांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. 

आज महापौरपदाची निवड झाल्यानंतर सत्कार स्विकारून नूतन महापौर वाकळे सभागृहाच्या बाहेर आले. महापालिकेच्या दारात उपोषणास बसलेल्या कामगारांमध्ये जावून त्यांनी त्यांचे प्रश्न समजावून घेतले. आता मी आलोय, तुमचे प्रश्न सोडविणार, असे आश्वासन दिल्याने कामगारांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच उपोषण मागे घेतले.

टॅग्स

संबंधित लेख