आमदार संग्राम जगतापांची पोलिस कस्टडी वाढवली! 

केडगाव येथील दुहेरी हत्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलिस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. ता. 18 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.
आमदार संग्राम जगतापांची पोलिस कस्टडी वाढवली! 

नगर : केडगाव येथील दुहेरी हत्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलिस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. ता. 18 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले. 

शिवसेनेचे केडगाव येथील शहर उपप्रमुख संजय कोतकर व कायकर्ते वसंत ठुबे यांची शनिवारी (ता.7) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच याच प्रकरणी इतर गुन्ह्यांत आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर यांच्यासह इतर जण अटकेत आहेत. जगताप यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com