nagar-maratha-reservation-pedhe-distribution-cm-fadanvis | Sarkarnama

मराठा आरक्षण; शनिच्या दरबारात वाटले मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके पेढे

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नगर : मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एक डिसेंबरच्या आत मराठा समजाला आरक्षण दिले. त्यामुळे त्यांचे स्वागत म्हणून आज शनि शिंगणापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके म्हणजे शंभर किलो पेढे व लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी लोकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.

शनि शिंगणापूर येथे शनिच्या दरबारात झालेल्या शेतकरी मराठा महासंघ व वारकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. मराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा, असे त्यांनी म्हटले होते. हा शब्द त्यांनी पाळला. त्याची आठवण म्हणून शेतकरी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शनि शिंगणापूर येथे शनि देवाला अभिषक करून मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके पेढे व लाडू वाटप केले. शनिच्या दरबारात मुख्यमंत्री खोटे बोलणार नाहीत, अशी चर्चा त्याच वेळी उपस्थितांमध्ये सुरू होती. त्यामुळे त्याच शनिच्या दरबारात आज या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

त्यांचे बलीदान व्यर्थ नाही - दहातोंडे
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आम्ही जल्लोष करीत नाहीत. कारण अनेकांचे या निर्णयासाठी बलिदान झाले आहे. अनेक युवक-युवतींनी आत्महत्या केली. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यामुळे हा जल्लोष नसून त्यांच्या बलिदानाची आठवण करण्याचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला. त्यामुळे त्यांच्या वजनाइतके पेढे व लाडूचा प्रसाद आज वाटप करण्यात आला, असे संभाजी दहातोंडे यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख