nagar maratha mla resignation issue | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

नगरमधील मराठा आमदार राजीनाम्यासाठी पुढे येईनात! 

मुरलीधर कराळे 
शनिवार, 28 जुलै 2018

नगर : सकल मराठा मोर्चाच्यावतीने झालेल्या आंदोलनामुळे मराठा आमदारांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले. मराठा समाजाकडूनही अशा राजीनाम्याची मागणी सुरू झाली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील आमदारांपुढे पेच निर्माण झाला आहे. 

राजीनामा देण्याची मागणी समाजातून होत असताना आता थोडेच महिने राहिले, राजीनामा द्यावा, की थांबावे, अशा मनःस्थितीत आमदार असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपच्या आमदार मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे यांच्याविरोधात मात्र सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल होवून त्यांना त्याची डोकेदुखी ठरू पाहत आहे. 

नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार विजय औटी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप, संग्राम जगताप हे मराठा आमदार आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे हे मराठा आमदार आहेत. कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात हे मराठा आहेत. नगर जिल्ह्यात सकल मराठा आंदोलन अत्यंत सक्रीय आहे. राज्यातील काही आमदार राजीनामे देत असताना नगरमधून मात्र राजीनाम्याचे कोणी नाव घेत नाहीत, या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या वतीने राजीनाम्याची मागणी होत आहे. राजीनामा द्यावा तरी अडचण व नाही द्यावा तर मराठा समाजाच्या नेत्यांची नाराजी, अशा द्विधा मनःस्थितीत हे नेते सापडले आहेत. 

संबंधित लेख