SP कार्यालयात तोडफोड करणारे नगरसेवक कैलास गिरवले अत्यवस्थ 

नगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज त्यांची प्रकृती खालावली होती. सायंकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.
SP कार्यालयात तोडफोड करणारे नगरसेवक कैलास गिरवले अत्यवस्थ 

नगर : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज त्यांची प्रकृती खालावली होती. सायंकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर शनिवारी (ता. 7) राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून जगताप यांना पळवून नेले होते. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे देखल करण्यात आले होते. त्यामध्ये कैलास गिरवले यांचाही समावेश होता. या गुन्ह्याबरोबरच त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. माळीवाडा येथे पोलिसांनी घातलेल्या छाप्यात अवैध फटाके व सुगंधी सुपारीचा साठा आढळून आला होता. त्याप्रकरणी गिरवले यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची पोलिस कोठडी रविवारी संपणार होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात उभे करण्यात येणार होते, मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com