Nagar DJ Ban Dhol Tasha Started Since Morning | Sarkarnama

डिजेला बंदी असल्यामुळे नगरमध्ये काही मंडळांकडून पहाटेच ढोल-ताशे कडाडले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 सप्टेंबर 2018

ध्वनिप्रदुषणासंदर्भात राज्य सरकारचा युक्तिवाद मान्य करीत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी साउंड सिस्टीमवरील (डिजे) बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकित दणदणाट होणार नाही. गणेशोत्सव काळात डीजे किंवा कर्णकर्कश गोंगाटाकडे डोळेझाक करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नगर : शहरातील १३ मानाच्या गणपतीमंडळांपैकी १२ मंडळे डिजेबंदीमुळे रुसली आहेत. मिरवणुकीवर बहिष्कार टाकून आपण मिरवणुकीत सहभागी होणार नसल्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे यंदाची विसर्जन मुरवणुकीत दणदणाट अनुभवयास मिळणार नाही. दरम्यान, डीजेला परवानगी नाकारल्यामुळे काही मंडळांनी आज पहाटेच गणेशविसर्जन केले. त्यामुळे नगर शहरातून मध्यरात्री एक वाजण्याच्या नंतर ढोल-ताश्यांचा आवाज सुरू होता.

ध्वनिप्रदुषणासंदर्भात राज्य सरकारचा युक्तिवाद मान्य करीत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी साउंड सिस्टीमवरील (डिजे) बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकित दणदणाट होणार नाही. गणेशोत्सव काळात डीजे किंवा कर्णकर्कश गोंगाटाकडे डोळेझाक करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. डीजे मालकांनाही तंबी देण्यात आली आहे. याबाबत पुण्यात शनिवारी सकाळी काही मंडळांची बैठक झाली. मंडळे आक्रमक होऊन गणेशभक्तांवर हा अन्याय असल्याचे त्यांनी म्हणत विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार घातला. याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. न्यायालयात मंडळाची बाजू व्यवस्थित मांडली नाही, असा दावा या मंडळाने केला. 

त्याचे पडसाद नगरमध्ये उमटले. नगरच्या मंडळांनीही काल विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नगरमध्ये मानाचे १३ गणपती आहेत. पहिला नगरचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील गणपतीचा असतो. या तेरापैकी १२ मंडळांनी मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. याबाबत काल रात्री उशिरापर्यंत मंडळांचे प्रतिनिधी शिवाजी कदम, अविनाश घुले, संभाजी कदम, संजय घुले आदींनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेतली. ऐनवेळी पारंपारिक वादय वाजविता येणार नाहीत. त्यामुळे कमी आवाजात (७५ डिसिबल) डिजे वाजविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली, मात्र परवानगी मिळाली नाही.  

संबंधित लेख