nagar deputy mayor anil borude | Sarkarnama

नगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 मार्च 2018

महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी आज शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीपासून अलिप्त होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आज सकाळी माघार घेतल्याचे जाहीर केल्याने बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. 

नगर : महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी आज शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीपासून अलिप्त होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आज सकाळी माघार घेतल्याचे जाहीर केल्याने बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. 

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी झाली.  भाजपनेही त्याची हकालपट्टी केली होती. त्यामुळे उपमहापौर पद रिक्त झाले होते. त्यासाठी आज ही निवडप्रक्रिया झाली. 

जिल्हाधिकारी अभय महाजन महापालिका सभागृहात दाखल झाल्यानंतर  उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीतून इतर सर्व इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने बोरुडे यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

निवडणुकीत 37 नगरसेवकांनी सहभाग घेतला. कॉंग्रेसचे मुदस्सर शेख, दीप चव्हाण, जयश्री सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचा बंडखोर गटही मतदान प्रक्रियेत सहभागी झाला होता. 

"मनसे'च्या वीणा बोज्जा, शिवसेनेच्या दीपाली बारस्कर, "राष्ट्रवादी'चे अरिफ शेख, विपुल शेटीया, कॉंग्रेसचे मुदस्सर शेख आदींनी माघार घेतली.
 

संबंधित लेख