nagar bjp press | Sarkarnama

परिवर्तन होणार- नगर बदलणार, भाजपचा महापौर होणार!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नगर शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सुमारे पन्नास मुद्दे घेवून भाजप नेते रिंगणात उतरले आहेत.

नगर : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत राज्य पातळीवरील नेत्यांना सभांसाठी निमंत्रित केले आहे. नगर शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सुमारे पन्नास मुद्दे घेवून भाजप नेते रिंगणात उतरले आहेत. याबाबत पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देवून महापालिका जिंकण्याचा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी दिलेल्या योजनांचा उहापोह करीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचे नेत्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असे ठामपणे सांगत पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.

नगर शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी घरोघरी हा संकल्पनामा दिला जाणार आहे. संकल्प नगरच्या सर्वांगिण विकासाचा, परिवर्तन होणार - नगर बदलणार, हे ब्रिद घेवून हा वचननामा घेवून घरोघरी पोहच केला जाणार आहे.

प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात बाजारपेठा विकास, उद्योगविकास, टेक्सटाईनल हबची निर्मिती, स्वयंचलित स्मार्ट पथदिवे, मुबलक व नियमित पाणीपुरवठा असे मुद्द्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच या सुविधा देण्यासाठी राज्य व केंद्राची मदत घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख