nagar bjp | Sarkarnama

मराठा आरक्षणामुळे नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नगर : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आज जिल्ह्यात भाजप नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सरकारी नोकरी व शिक्षणात हे आरक्षण मिळणार असल्याने या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

भाजपचे खासदार दिलीप गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, नरेंद्र कुलकर्णी आदींनी ढोल वाजवित व फटाके फोडत या निर्णयाचे भाजप कार्यालयाच्या परिसरात जोरदार स्वागत केले. या वेळी एकमेकांना पेढे भरविण्यात आले. 

संबंधित लेख