nagar-balasaheb-thorat-satyajit-tambe | Sarkarnama

आगामी निवडणुकीत युवकांचे जू सत्यजित तांबे यांच्या खांद्यावर : आमदार थोरात

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

सत्यजित तांबे हे धडपडीचे व चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रभर त्यांनी युवकांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांची निवड ही राज्यातील युवकांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व समविचारी पक्षाच्या विजयात युवक काँग्रेसने मोठी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन काँग्रेस वर्किंग समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगर : सत्यजित तांबे हे धडपडीचे व चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रभर त्यांनी युवकांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांची निवड ही राज्यातील युवकांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व समविचारी पक्षाच्या विजयात युवक काँग्रेसने मोठी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन काँग्रेस वर्किंग समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर अमृत उद्योग समूह व तालुक्याच्यावतीने सत्यजित तांबे व नवीन पदाधिकार्‍यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. 

थोरात म्हणाले, की संगमनेर तालुक्याच्या व जिल्ह्याच्या दृष्टीने सत्यजित तांबे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होते, हा मोठा बहुमान आहे. सत्यजित हा काँग्रेसचा अभ्यासू व धडपडणारा संघर्षशील युवा नेता आहे. राज्यभर त्यांनी मोठा संपर्क निर्माण केला आहे. पक्षाच्या धोरणांची अत्यंत प्रभावीपणे मांडणी कायम त्यांनी केली असून, युवकांचा आश्‍वासक चेहरा अशी ओळख त्यानी निर्माण केली आहे. बुथनिहाय युवक कार्यकर्ते तयार करा. चांदा ते बांदा युवकांची नव्याने बांधणी करा. अविश्रांत काम करा. चांगले काम ही आपली परंपरा आहे. यापुढे प्रत्येक दिवस व तासाचे नियोजन करुन राज्यात पक्ष संघटनेची बांधणी करा. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद हा पक्षाच्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयामध्ये महत्वाचा असतो. लोकसभा, विधानसभा निवडणूक झोकून देवून काम करणारे युवक निर्माण तयार झाले, तर विजय निश्‍चित आहे. आता देशात व रायामध्ये सत्तापरिवर्तन अटळ आहे. लोक भाजपाच्या भुलथापांना वैतागले आहे. नुसत्या जाहिरातबाजी न करता विकासाचे काँग्रेस सरकार लोकांना हवे आहे. संगमनेर तालुक्यात `एक तालुका एक परिवार' ही संकल्पना राबवून सर्वांना बरोबर घेवून येथे विकास साधला आहे. मागील 35 वर्षात एकही सुट्टी न घेता सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत जनतेची कामे करुन एक मॉडेल तालुका निर्माण केला आहे, असे तालुका इतरत्र निर्माण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना सत्यजित तांबे म्हणाले, की युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद हे सर्व युवकांचे बळ आहे. मागील २० वर्षांपासून आपण प्रामाणिकपणे युवक चळवळीत काम केले. राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा शांत व संयमी, अभ्यासू स्वभावामुळे त्यांचा राज्यात मोठा आदर असून, त्यामुळे युवकांची मोठी पसंती मिळाली.
 

संबंधित लेख