nagar anil rathod on parner issue | Sarkarnama

उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली नाही : राठोड

मुरलीधर कराळे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नगर : पारनेरमध्ये आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर ते पुढे गेले. त्यानंतर काही गाड्यांवर दगडफेक झाली. शिवसेनाप्रमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्याची महाराष्ट्रात कोणाची ताकद आहे का, अशा शब्दांत दगडफेकीबाबत माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी "सरकारनामा'शी बोलताना माहिती दिली. 

पारनेरमध्ये आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यास उद्धव ठाकरे उपस्थित होते. ठाकरे गेल्यानंतर मागील काही गाड्यांवर दगडफेक झाल्याबाबत राठोड यांनी स्पष्टीकरण दिले. 

राठोड म्हणाले, एका गाडीचा धक्का काही कार्यकर्त्यांना लागला. त्या वेळी काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. एका गाडीचे चाक माझ्याही पायावरून गेले. त्यामुळे मलाही थोडी जखम झाली. आताच उपचार घेऊन आलो आहे. ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची चर्चा जिल्हाभर पसरली. परंतु ठाकरे यांच्या गाडीवर नव्हे, तर इतर कोणत्यातरी गाडीवर दगडफेक झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्याची कोणाचीही ताकत आहे का, असा सवाल राठोड यांनी केला. 

संबंधित लेख