nagar action again nilesh lanke | Sarkarnama

निलेश लंके यांना हटवले; बंडू रोहोकले नवे तालुकाप्रमुख ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

पारनेर शिवसेना तालुकाप्रमुखपदी विकास उर्फ बंडू रोहोकले यांची निवड झाल्याचे आज शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्यामुळे निलेश लंके यांना संबंधित पदावरून पायउतार केल्याचे अखेर स्पष्ट झाले. याबाबत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मध्यवर्ती कार्यालयातून पत्राद्वारे रोहोकले यांना कळविले आहे. 

नगर : पारनेर शिवसेना तालुकाप्रमुखपदी विकास उर्फ बंडू रोहोकले यांची निवड झाल्याचे आज शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्यामुळे निलेश लंके यांना संबंधित पदावरून पायउतार केल्याचे अखेर स्पष्ट झाले. याबाबत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मध्यवर्ती कार्यालयातून पत्राद्वारे रोहोकले यांना कळविले आहे. 

आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पारनेर येथील सभेच्या वेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लंके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. तसेच काही कार्यकर्त्यांकडून गाड्यांवर झालेली दगडफेक झाल्याने पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे पारनेर तालुक्‍याचे लक्ष लागले होते. घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई येथे बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पक्षश्रेष्ठींनी जाहीर केले होते, तथापि, हा निर्णय यथावकाश घेऊन शिवसेनेने आपला हिसका दाखवून दिला आहे. 

शिवसेना प्रमुखाच्या समोर झालेल्या प्रकाराची किंमत लंके यांना मोजावी लागेल, असे शिवसेना वर्तुळातून बोलले जात होते, तथापि, पक्षाने तातडीने काहीच कारवाई केली नसल्याने कारवाई होईल की नाही, याबाबत तालुक्‍यातून उलटसुलट चर्चा घडून येत होती. आमदार औटी यांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न झाला होता. आता तालुकाप्रमुखपद गेल्याने लंके यांचे आमदार औटी यांना मोठे आव्हान राहणार असल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीची समिकरणे बदलणार आहेत. 

आमदार विजय औटी यांना आता विधानसभा निवडणुकीसाठी लंके यांचेच आव्हान राहणार आहे. कारण औटी यांच्या विजयात लंके यांचा मोठा वाटा होता. शिवसेनेतील मोठा युवा वर्ग लंके यांना माणणारा आहे. या युवकांनी शिवसेनेची कास सोडली नाही, तरी लंके यांच्यामागे ते उभे राहतील, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. लंके यांनी तीर्थयात्रेच्या माध्यमातून तालुक्‍यातील घराघरात स्वतःची केलेली वैयक्तिक ओळख असलेली ही शिदोरी लंके यांना आगामी काळात कामे येईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला इतर पक्षापेक्षा लंके यांच्या भूमिकेचेच आव्हाण राहणार आहे. 

संबंधित लेख