Nafed will purchase pulese upto 31 may | Sarkarnama

 तुर खरेदीची अंतिम तारीख ३१ मे

संदीप खांडगेपाटील
मंगळवार, 16 मे 2017

२७ एप्रिेल ते १४ मेपर्यत राज्य सरकारकडून ७ लाख ६१ हजार क्विंटल तुर खरेदी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून तुर खरेदीबाबत ३१ मे ही अंतिम मुदत देण्यात आली असून या मुदतीत तुर खरेदी करण्याकरिता राज्य सरकारच्या कृषी तसेच पणन विभागाची धावपळ सुरु झाली आहे. 

मुंबई :  राज्याच्या ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पाऊसाने शेतकर्‍यांची तारांबळ केलेली असतानाच तुरखरेदीची अंतिम तारीख जवळ आल्याने तुर खरेदी करतानाही प्रशासनाचीही धावपळ होत असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली.

यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असून १ कोटी ११ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले असल्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न तीनपटीच्या जवळपास आहे. 

राज्य सरकारने २२ एप्रिलपर्यत ४१ लाख ५१ हजार क्विंटल तुर खरेदी केली. शेतकर्‍यांकडे तूर मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहील्याने विरोधी पक्षांनी, शेतकरी संघटनांनी, सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेदेखील तुर खरेदीच्या विषयावर भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

 तुरीचे ६५ ते ७० टक्के उत्पादन मराठवाडा आणि विदर्भ भागातच होत असल्याने पूर्वीपासून पाठराखण करत असलेला पारंपारिक मतदारही दुरावण्याचा धोका भाजपापुढे निमार्र्ण झाला.

२७ एप्रिलपासून पुन्हा राज्य सरकारने ८८ खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांची तुर खरेदी सुरु केली असून या तुर खरेदीचे पैसे शेतकर्‍यांना वेळेवर मिळत नसल्याची तक्रार शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. 

संबंधित लेख