nadurbar-jayant-patil-statement | Sarkarnama

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर : जयंत पाटील  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अशी आघाडी करावी किंवा नाही, हा निर्णय स्थानिक पातळीवरील आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत आघाडीचे सूतोवाच केले.

नंदुरबार : लोकसभा, विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अशी आघाडी करावी किंवा नाही, हा निर्णय स्थानिक पातळीवरील आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत आघाडीचे सूतोवाच केले.
 
पाटील आज जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. या वेळी पाटील म्हणाले, की मराठा व धनगर समाजासह विविध समाजांच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जात नाही. मात्र, निवडणूक जवळ आली, की सरकार हे निर्णय त्वरित घेऊन फलकबाजी करेल. राज्यात शेतकरी, व्यापारी, नोकरदार, सामान्य जनता या शासनाबाबत समाधानी नाही. प्रत्येक जिल्ह्यात एका महिन्यात बूथ कमिट्या तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख